http: //ift .tt/ 1sEGd8q |
निबंधाच्या वहीत अनुक्रमणिकेत लिहा- "गद्य आकलन - ३"
निबंधाच्या वहीत पुढील परिच्छेद लिहा.
त्याखाली दिलेले प्रश्न लिहा व त्यांची उत्तरे लिहा.
===========-
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो?
फुलांमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतात. ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात.
कोणत्या फुलांत कोणती रंगद्रव्ये असावीत, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही.
प्रश्न-
- कॅरोटीनमुळे फुलांना कोणते रंग मिळतात?
- अँथोसायनिन यामुळे फुलांना कोणते रंग मिळतात?
- गुणसूत्रे काय ठरवतात?
- फुलांचा रंग ठराविकच का असतो?
- दहा रंगांची नावे लिहा.