फोटो - प्रहार |
निबंधाच्या वहीत अनुक्रमणिकेत लिहा- "गद्य आकलन - ३"
निबंधाच्या वहीत पुढील परिच्छेद लिहा.
पुढील परिच्छेद नीट व स्पष्ट वाचा.
त्याखाली दिलेले प्रश्न लिहा व त्यांची उत्तरे लिहा.
=============-
रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले, की मन कसे प्रसन्न होऊन जाते. आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक, टवटवीत, गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते; पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? दुसर्याला प्रफुल्लित करत, सुवास देत ते 'हसत-बागडत’ राहते. ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना, की “मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. दुसर्यांना आनंद, सुख-समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे.”
प्रश्न-
- मन कशाने प्रसन्न होते?
- आजुबाजूचे वातावरण सुगंधित का होते?
- फूल कसे जगते?
- फूल आपल्याला काय सांगत असेल?
- पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा- टवटवीत, रंगीबेरंगी, प्रफुल्लित.