वाक्यांचे प्रकार

वाक्यांचे प्रकार.

(१) विधानार्थी वाक्य 

या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते.
(अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
(आ) तो रोज व्यायाम करत नाही.

(२) प्रश्‍नार्थी वाक्य

या प्रकारच्या वाक्यांत प्रश्‍न विचारलेला असतो
(अ) तुला लाडू आवडतो का?
(आ) तुम्ही सकाळी कधी उठता?

(३) उद्गारार्थी वाक्य

या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असतो.
(अ) अरेरे ! फार वाईट झाले.
(आ) शाबास ! चांगले काम केलेस!

(४) आज्ञार्थी वाक्य

. या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.
(अ) मुलांनो, रांगेत चला.
(आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा.

वरील प्रकारातील वाक्ये होकारार्थी व नकारार्थी या दोन्ही असू शकतात.

(५). होकारार्थी वाक्य –
या वाक्यामधून होकार दर्शविला जातो.
उदा .
त्याला सरबत आवडते.
रमेश काम करत आहे.

(६). नकारार्थी वाक्य –
या वाक्यामधून नकार दर्शविला जातो.
उदा.
मी क्रिकेट खेळत नाही.
मला पपई आवडत नाही.


स्वाध्याय-

पुढील वाक्याचे प्रकार ओळखा.

  1. पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो.
  2. माझ्यासाठी काही पत्र आहे काय ?
  3. आई गं ! किती लागलंय तुला |
  4. तुझे पुस्तक मला दे.
  5. खूप शीक. खूप मोठा हो.
  6. अबब ! केवढी प्रचंड आग ही !
  7. तू मुंबईला केव्हा जाणार आहेस ?
  8. ती आनंद व्यक्‍त करीत नव्हती.

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी