पुढील परिच्छेद वाचा, समजून घ्या, तो निबंधाच्या वहीत लिहा, त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
अग्निशमन दल
'कोठेही आग लागली, तर एक लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते. त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात. आग बिझवतात. या दलातील कर्मचाऱ्यांच्या 'हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात. आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते.
आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते. या दलास पाचारण करण्यासाठी १०१ या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशील देतात. अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते. आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य केले पाहिजे. ते देत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे. त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही, असे आवर्जून पाहिले 'पाहिजे, कारण “अग्निशमन दल' हा आपला मित्र आहे.
प्रश्न-
- अग्निशमन दलाचे कर्मचारी काय घेऊन आग आटोक्यात आणतात?
- त्यांच्या हालचाली कशा असतात?
- अग्निशमन दल कोणकोणती कामे करते ?
- अग्निशमन दलाचा दूरध्वनी क्रमांक कोणता?
- कामात असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी विषयी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ?
- दहा रंगांची नावे लिहा-
- पुढील शब्दांचे इंग्रजीत अर्थ लिहा.
कर्मचारी, शिस्तबद्ध, प्रात्यक्षिक, आपत्कालीन, तात्काळ, व्यत्यय