विकीपेडीया |
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा
बुडती हे जन देखवेना डोळा ।
म्हणोनि कळवळा येतो आम्हां ॥
‘भले तरी देवू कासेची लंगोटी ।।
नाठाळाचे माथा हाणू काठी’ ।।
‘असाध्य ते साध्य । करिता सायास ।।
कारण अभ्यास । तुका म्हणे ।।
‘अंगा लावुनिया राख ।
डोळे झाकुनिया करती पाप ।
‘ऐसे संत होती काळी । सुखी तंबाखुची नळी ।।१।।
भांग, सुर्का दे साधन । पची पडे मधपान ।।२।।
तुका म्हणे अवघे सोंग । तेथे कैचा पांडुरंग’ ।।३।।
‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदची अंग आनंदाचे ।।
‘सुख पाहता जवापोड।
दुःख पर्वता एवढे’।
‘नवसे पूत्र होती ।
तेणे का करणे लागे पती ।।
‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती ।
देह कष्टविती परोपकारे’
न देखवे डोळा ऐसा हा आकांत ।
परपिडे चित्र दुःखी होते ।।
परोपकार ते पुण्य ।
परपिडा ते पाप ।।
दया तिचे नाव युतांचे पालन ।
आणिक निर्दालन कंटकांचे ।।
वृक्षवल्ली आम्हा सोयरे ।
वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती ।।
आकाश मंडप पृथ्वी आसन ।
तेथे माझे मन क्रीडा करी ।।
धर्माचे पालन । करणे पाखंड खंडन ।।
हेचि आम्हां करणे काम । बीज वाढवावे नाम ।।
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें ।
उदास विचारें वेच करी।।
सत्य असत्याशी मन केले ग्वाही ।
मानियेले नाही बहुमता ।
नाही निर्मळ जीवन ।
काय करील साबण।।
तैसे चित्त शुद्धी नाही ।
तेथे बोध करील काई।।