संतांचे कार्य

 संतांचे कार्य-

Wikipedia


 अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, शोषण, विषमता, जातिभेद यांनी किडलेला समाज -  संतांचा उदय - आचार, विचार,  तत्त्वज्ञान,  भागवत धर्म -  प्रचंड कार्य - 

 सामान्यांचे शोषण थांबवण्याचे कार्य-  धर्म, कर्मकांड, पूजा, व्रते इत्यादीतून सामान्य लोकांची प्रचंड लूट. संतांनी  भक्ती मार्ग दिला -  ईश्वरापर्यंत जाण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही - लोकांना भक्तीचा,  धर्माचा, अध्यात्माचा चा अधिकार - धर्माच्या नावावर लोकांची होणारी लूट थांबली/  कमी झाली. 

अंधश्रद्धा निर्मूलन-  अनेक खोट्या काल्पनिक गोष्टी, विविध अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न -  घातक रूढी, परंपरा, कर्मकांड दूर करण्याचे कार्य- मानहानी, त्रास सहन केला . 

समानता- एकात्मता- जाती-धर्म विसरून लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न -  समानतेचा  उपदेश - समता, भूतदया, करुणा,परोपकार,औदार्य ही मूल्ये रुजवली-  

आत्मविश्वास -  राजकीय अस्थिरता - सामाजिक अशांती-  दुष्काळ -  विविध समस्या -  मानसिक संघर्ष - लोकांना मानसिक शांती- आत्मविश्वास दिला- समाज सुखी होण्यासाठी प्रयत्न

साहित्य-  ग्रंथ,  जुन्या ग्रंथांचे विश्लेषण,  अभंग,  गवळण,  भारुड,  ओव्या,  श्लोक  इत्यादी साहित्य प्रकार. - प्रचंड साहित्याची निर्मिती. - यातून मानवतेची मूल्ये  रुजविली. - तत्कालीन सामाजिक जीवन समजते. 

संतांची  सामाजिक-  सांस्कृतिक-  अध्यात्मिक-  साहित्यिक चळवळ व क्रांती - धार्मिक कट्टरता, धार्मिक दुश्मनी, लोभी जीवन,  हावरटपणा - संतांचे विचार महत्वाचे. 


जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले

तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा

 संत तुकाराम

बुडती हे जन देखवेना डोळा ।

म्हणोनि कळवळा येतो आम्हां ॥

संत तुकाराम 

उदाहरणे-

सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा, सावता माळी, बंका महार, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत सखुबाई,संत भागुबाई, 

संत नामदेव- भारतभर प्रवास 

चक्रधर स्वामी-  सामान्य लोकांमध्ये कार्य

 संत एकनाथ-  महाराच्या वस्तीत  मूल पोचवले

 संत ज्ञानेश्वर-  गीता मराठीत आणली 

गाडगे महाराज- स्वच्छता, शिक्षण यांचा प्रचार

 तुकडोजी महाराज-  खेड्यांची, गावांची सुधारणा


पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी