07_01_नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 
Namaskar Majha Ya DnyanMandira- Jagdish Khebudkar



श्री जगदीश खेबुडकर यांची ही एक सुंदर रचना. यात शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा व कृतज्ञतेची भावना व्यक्त केलेली आहे.

कवितेचा अर्थ-

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा |
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ||


अर्थ- आमची शाळा हे ज्ञान देणारे मंदिर आहे. या शाळेला आम्ही नमस्कार करतो. ही शाळा सत्य, खरे ज्ञान शिकवते. ही शाळा पवित्र व मंगल ठिकाण आहे. ही शाळा सुंदर आहे.

शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा , चिमणपाखरा ||१||

अर्थ- हे शाळा, तू आम्हाला शब्दांची शक्ती दे. आमची भाषा-संपत्ती चांगली कर. तू आम्हाला भावनेची भक्ती दे. आमच्या मनात ज्ञानाविषयी, भक्तीभाव निर्माण कर, आमच्यासारख्या लहान मुलांना प्रगतीचे पंख दे. आमची प्रगती होऊ दे.

विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा, दयासागरा ||२||


अर्थ- आम्हाला विद्यारूपी धान, संपत्ती दे. शिक्षण मिळवणे हा आमचा छंद आहे. हे दयासागर शाळा, आमच्या जीवनाची नाव पैलतीरी पोचाव. आम्हाला आमचे ध्येय्य पूर्ण करून आमच्या जीवनात यशस्वी कर.

होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा ||३||

अर्थ- आम्ही शाळेत चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार शिकून नीतीमान होऊ. विविध कला व गुण मिळवून आम्ही बुद्धिवान होऊ. मग आमची कीर्ती खूप उंचावर, खूप दूरवर जाईल.

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी