इयत्ता- ७- Internal Evaluation अंतर्गत मूल्यमापन - याविषयी सूचना

अंतर्गत मूल्यमापन - याविषयी सूचना 

(विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार, लवकरात लवकर सादर करावे. Submit it as per your convenience, at earliest.)

अंतर्गत मूल्यमापनच्या फॉर्ममध्ये पहिल्या ४ जागांमध्ये अचूक माहिती भरा .

५) दिलेल्या ५ निबंधांपैकी एक विषय सिलेक्ट करा.

एका विषयावर १ फुलस्केप एवढा निबंध कागदावर लिहा. त्याचा फोटो काढून तयार ठेवा.

६) निबंधाचा एकच फोटो अपलोड करा.

७) भाषणाचे ५ विषय दिले आहेत. त्यापैकी भाषणाचा एक विषय सिलेक्ट करा.

त्यावरील तुमचे एक ते दोन मिनिटाचे भाषण मोबाईलवर रेकोर्ड करा. लो क्वालिटी मध्ये रेकॉर्ड केला तर कमी MB मध्ये रेकॉर्ड होईल. रेकॉर्ड करताना डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण भाग व्हिडीओत आला पाहिजे. तसेच व्हिडीओ मध्येमध्ये एडीट केलेला नसावा. व्हिडीओ कॉम्प्रेस हे एप वापरले तर बऱ्याच कमी MB मध्ये व्हिडीओ पाठवता येईल. 

८) एका विषयावरील तुमच्या एक-दोन मिनिटाच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप अपलोड करा.

९) वाचन-

दिलेल्या पाठाचा भाग वाचायचा आहे. वाचत असतांना मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्ड करा. लो क्वालिटी मध्ये रेकॉर्ड केला तरी चालेल. खुर्चीवर बसून टेबलवर पुस्तक ठेऊन वाचले तरी चालेल. व्हिडीओ मध्येमध्ये एडीट केलेला नसावा.

ती व्हिडीओ क्लिप अपलोड करा.

टीप -
व्हिडीओ कॉम्प्रेस यासारखे  एप वापरले तर बऱ्याच कमी MB मध्ये व्हिडीओ पाठवता येईल.
त्याविषयी पद्धती पुढील व्हिडीओ मध्ये दिली आहे.
How to compress video file? व्हिडीओ कॉम्प्रेस कैसे करे? व्हिडीओ कॉम्प्रेस कसा करावा?


= यशस्वी कार्यासाठी अनेक शुभेच्छा! =

इयत्ता ७ वी

निबंधांचे विषय-
आमचे खेळाचे मैदान
माझा भाऊ/ माझी बहीण
अचानक वीज जाते तेव्हा...
कोरोनाचे संकट
पावसाळ्यातील एक दिवस

भाषणांचे विषय-
प्रवासाचे फायदे
खरा मित्र कोण?
झाडे लावा, झाडे जगवा.
शेती आणि आपण
बेरोजगारीची समस्या

पाठ वाचनाचा मजकूर-
पृष्ठ ४३, आपली समस्या, आपले उपाय-२ हा संवाद वाचायचा आहे.

स्वाध्याय सादर submit करण्याच्या फॉर्मची लिंक-



पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी