वसंत ऋतू -
प्रथम मुद्दे व त्यावरून परिच्छेद दिलेले आहेत. शेवटी एकसंध निबंध दिला आहे.
मुद्दे- प्रसंग- पहाटेचे कोकिळेचे गाणे-
(वरील मुद्द्यांवरून परिच्छेद)-
प्रस्तावना-
मुद्दे- प्रसंग- पहाटेचे कोकिळेचे गाणे-
(वरील मुद्द्यांवरून परिच्छेद)-
आज कोकिळेच्या मंजुळ गाण्याने जाग आली. त्या गाण्याने मंत्रमुग्ध झालो. ... आणि जाणीव झाली- अरे वसंत तर आला! वसंताच्या आगमनाने प्रचंड आनंद झाला आणि कोण्या कवीची एक कविता मनात अलगद पाझरली ---
चैत्र वैषाख चाहूल लागे
ऋतुराज वसंत नाचू लागे
वृक्षासी नव पर्ण विराजे
पक्षी कोकिळा गाऊ लागे
स्पष्टीकरण
मुद्दे- भौगोलिक- कल- मुख्य ऋतू- उपऋतु - महिने- फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल - चैत्र आणि वैशाख - स्प्रिंग (Spring)
(वरील मुद्द्यांवरून परिच्छेद)-
चैत्र वैषाख चाहूल लागे
ऋतुराज वसंत नाचू लागे
वृक्षासी नव पर्ण विराजे
पक्षी कोकिळा गाऊ लागे
स्पष्टीकरण
मुद्दे- भौगोलिक- कल- मुख्य ऋतू- उपऋतु - महिने- फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल - चैत्र आणि वैशाख - स्प्रिंग (Spring)
(वरील मुद्द्यांवरून परिच्छेद)-
आपल्याकडे मुख्य तीन ऋतू आहेत- उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. त्याचप्रमाणे सहा उपऋतू आहेत- वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. हे सर्व ऋतू महत्त्वाचे आहेत. पण त्यात वसंत ऋतू स्वतःचे महत्त्वाचे स्थान टिकवून आहे. इंग्रजीमध्ये याला स्प्रिंग असे म्हणतात. पृथ्वी तिच्या अक्षांशी २३.५ त्याने कलली असल्यामुळे आपल्याला हे निसर्गाचे चमत्कार अनुभवायला मिळतात. ग्रेगरियन कॅलेंडर प्रमाणे फेब्रुवारी-मार्च या दरम्यान तर मराठी महिन्याप्रमाणे चैत्र-वैशाख या दरम्यान वसंत ऋतूचे आगमन होते.
मुद्दे- वातावरण- थंडी- उष्णता- अल्हाददायक- तपमान- सुखद

वसंत ऋतूत वातावरणात अतिशय आल्हाददायक आणि सुखद असते. शिशिराची थंडी संपलेली असते आणि ग्रीष्माची दाहक उष्णता आलेली नसते. त्यामुळे वसंतातील वातावरण सर्वांना हवेहवेसे वाटते.
मुद्दे- सृष्टी- हिरवे- पालवी- आंब्याचा मोहर- सरसूचे शेत- माळरान

वसंत ऋतूत सृष्टी हिरवीगार वस्त्रे नेसून सजलेली असते. झाडांना कोवळी पालवी आलेली असते. सूर्यप्रकाश पुरेसा मिळाल्यामुळे झाडांना फुलेही भरपूर आलेली असतात. आंब्याचे झाड मोहरांनी सजलेले असते. सरसोचे शेत पिवळ्या फुलांनी झगमगत असते. सगळीकडे कोवळी लुसलुशीत पालवी आपल्या मनाला आनंद देत असते. उजाड उघडे माळरान सुद्धा या दिवसात हिरवेकंच व रंगीबेरंगी झालेले असते.
मुद्दे- प्राणीजीवन- मानवी जीवन- स्फूर्ती – उत्साह – सहली - सण

वसंत ऋतूत मुबलक चारा-पाणी मिळाल्याने प्राणी, पक्षी सुद्धा आनंदात असतात. या ऋतूत आपल्या शरीरात स्फूर्ती, मनात उत्साह आणि बुद्धीत चमक व ह्रदयात चेतना निर्माण होते. लोक बगीचे, तलाव इत्यादी सहलीच्या ठिकाणी फिरायला, मजा करायला जात असतात. या ऋतूमध्ये गुढीपाडवा, होळी, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा ,वसंत पंचमी यासारखे विविध सण येतात व सांस्कृतिक दृष्ट्या समाज जीवन संपन्न बनवतात.
शेवट -
मुद्दे- सुंदर- ऋतुराज-
(वरील मुद्द्यांवरून परिच्छेद)-
शेवट -
मुद्दे- सुंदर- ऋतुराज-
(वरील मुद्द्यांवरून परिच्छेद)-
वसंत ऋतू हा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यसाठी सर्वात सुंदर ऋतू आहे.- या सर्व कारणांमुळे त्याला ऋतूंचा राजा म्हणजेच ऋतुराज म्हटले आहे. हा ऋतू मला खूप आवडतो.
अशातच एका कवीची कविता सहज मनात झिरपून जाते
वसंत आला, वसंत आला ।
तनामनाचा हिंदोळा झाला ॥

========X========
( एकसंध निबंध)
वसंत ऋतू -
आज कोकिळेच्या मंजुळ गाण्याने जाग आली. त्या गाण्याने मंत्रमुग्ध झालो. ... आणि जाणीव झाली- अरे, वसंत तर आला! वसंताच्या आगमनाने प्रचंड आनंद झाला आणि कोण्या कवीची एक कविता मनात अलगद पाझरली ---