नाम (मराठी व्याकरण)


नाम-
वस्तूंना दिलेले नाव-   वास्तव, काल्पनिक,  दृश्य,  अदृश्य
वस्तूंच्या गुणांना दिलेले नाव-



प्रकार-
सामान्य नाम,- मुलगा, झाड
विशेष नाम,  -  सुरेश,  पिंपळ
भाववाचक नाम -  हुशारी,  हिरवेपणा

अभ्यासात विशेषनामांचा उपयोग
लिंग, वचन, सामान्य रूप

स्वाध्याय 

कृती 1 - पुढील शब्दांपासून भाववाचक नामे  बनवा.

  1. सुंदर,  मधुर,  शूर,  धीर,  गंभीर,  वत्सल, नवीन, उदार, (य)
  2. मनुष्य,  पशू, शत्रु,  मित्र,  प्रौढ,  मम,  लघु, दाता/ दातृ, कर्ता/कर्तृ, प्रभू,   रसिक, (त्व)
  3. शहाणा,  देव,  मोठा,  प्रामाणिक, मूर्ख,  खरे,  साधा, चांगला,  थोर,  उदार,   (पण, पणा)
  4. श्रीमंत,  गरीब,  उंच, गोड,  वकील,  लबाड,  जादू,  हुशार,   (ई)
  5. शांत,  क्रूर,  नम्र,  सम, भव्य, दीन, स्वच्छ,  आत्मीय, उष्ण  (ता)
  6. पाटील, भिक्षु, आपला (की)
  7. गुलाम,  फसवा,  लुच्चा ( गिरी)
  8. गोड,  गार, ओला (वा)
  9. नवल,  चतुर, चपळ, खोद/खोदणे, धुणे,  दांडगा (आई)
  10. दया,  कष्ट,  झोप,  पाय, कणव, (आळू)


कृती 2 - पुढील परिच्छेदातून 5 नामे बाजूला काढा  व त्यांचे प्रकार ओळखा.
(उदाहरणार्थ-   मुंबई -   विशेष नाम)

 एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले, म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्याभोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले. लोकांचा धीर चेपलासे पाहून, इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली. एरवीचा ठाणे-मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास म्हणजे तब्बल एक दिवस खायचा; पण आता काय, अवघ्या सव्वा तासात ठाण्याचा असामी मुंबईला येऊ जाऊ लागला. मग मात्र लोकांची झुंबड लागली.


पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी