संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात.
वाक्याचे दोन भाग...
वाक्याचे दोन भाग...
- ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश्य आणि
- जे सांगायचे ते म्हणजे विधेय.
या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे, म्हणून 'मुलगा' हे उद्देश्य,
'जातो' हे विधेय आहे.
“त्याचा', 'मोठा' हे शब्द उद्देश्याचा विस्तार आहेत,
“दररोज', “आगगाडीने' हे शब्द विधेयाचा विस्तार आहेत.
स्वाध्याय -
1- पुढील वाक्यातील उद्देश विस्तार व विधेय विस्तार वेगळे करून लिहा.
- आमचा कुत्रा टॉमी बागेत खेळताना पडला.
- मी तुम्हाला पत्र लिहिले नाही.
- युद्ध संपल्याची बातमी कालच मिळाली.
- सगळीच झाडे पावसाळ्यात हिरवी होतात.
- हुशार विद्यार्थी नियमित अभ्यास करतात.
- पांढरे स्वच्छ दात शोभून दिसतात.
- चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.
- सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो.
- सरकारी दवाखान्यात खर्च कमी येतो.