X - शाल - शब्दांचा अभ्यास

Wikipedia

निमित्ताने - निमित्त - कारण - Reason

खेळण्याच्या निमित्ताने मी त्यांच्या घरी गेलो. काहीना काही निमित्त काढून तो पैसे मागतो.


बेतात - बेत - तयारी, कार्यक्रम # निघण्याच्या बेतात असणे - जाण्याच्या तयारीत असणे

गौरव - सन्मान - honour

एका पायावर हो म्हणणे - संपूर्ण तयारी दाखवणे -

विश्वकोशाचा - मराठी संदर्भ ग्रंथ - मराठी ज्ञानकोशाचे नाव - कोश - कोशाचा - encyclopaedia

दक्षिणेकडील - दक्षिण - पूर्वेकडील - पश्चिमेकडील - उत्तरेकडील

कविवर्य - मोठा कवी

अहोरात्र - रात्रंदिवस - Day and night

भरती - मोठ्या प्रमाणात असणे, (समुद्राची भरती - high tide) - जास्त गर्दी

उद्या समुद्राला भरती येईल. शुक्रवारी बाजारात लोकांची भरती येते.

श्रीफळ - नारळ ( सन्मान करताना, पूजा विधी करताना श्रीफळ हा शब्द वापरतात)

शालीन - सुसंस्कारित, नम्र, Decent, Modest, gentle, cultured (# अनेक शाली जवळ असणारा- उपरोधिक अर्थ)

शालीनता - नम्रता, संस्कारितपणा, decency, modesty

उपरोधिक - sarcastic - उपरोध sarcasm - टोमणा - ,

उपरोधिक खोच - satirical clue

मुळातच - मूळ - originally

कर्जबाजारी होणे - कर्जाने दिवाळखोर होणे, प्रचंड कर्जत बुडून जाणे - to be bankrupt

भिकेला लागणे - खूप गरीब होणे -

गमावणे - हरवणे -

प्रवासात त्याने पैसे गमावले.

शेकडो - hundreds of - हजारो - लाखो - करोडो - कोट्यवधी - डझनावरी

चिंचोळा - अरुंद, narrow

चिंचोळ्या - चिंचोळा प्रवाह - narrow stream - # चिंचोळी गल्ली - चिंचोळे रस्ते

चिंचोळ्या गल्लीत त्याचे घर आहे.

तट - किनारा - bank of river/ sea

कडाक्याची थंडी - खूप गारठा असलेली थंडी - chilling cold.

प्रवाह - ओघ - flow - पाण्याचा प्रवाह - प्रवाही भाषा - विचारांचा प्रवाह

टोपली - बांबू किंवा वेतापासून बनवतात - basket

उद्योगात - उद्योग - काम - कामकाज - धंदा - activity - work -

रहावले नाही - न रहावणे -

पुलकित - आनंदित, रोमांचित (# पु. ल. देशपांडे यांच्याकडून मिळालेली - पाठातील वेगळा अर्थ)

गुंडाळणे - लपेटणे - to wrap

ऊब - उष्णता, warmth

साहित्य संमेलन - लेखक, कवी, साहित्यिक यांचा मेळावा

बिनविरोध - unanimously - विरोध न होता - without any opposition, बिनतक्रार,

क्षीण - कमजोर

तत्कालीन - तत् + कालीन - त्या काळातील - contemporary - of that time

वर्षाव होणे - खूप प्रमाणात मिळणे, # वर्षा - पाऊस, वृष्टी

आठ बाय सहाच्या खोलीत - 8 फूट X 6 फूट आकाराची खोली

निकटवर्ती - जवळचा, जवळचे संबंध असलेला - very close # निकट - जवळ

सर्वाधिकार - सर्व + अधिकार - सर्व हक्क - all rights

गाठोडे - एखाद्या कापडात बांधलेले बोचके -

अतिप्रामाणिक - खूप प्रामाणिक # अतिशहाणा, अतिहुशार, अतिगरीब, अतिसुंदर

सांभाळले - सांभाळणे - जपून ठेवणे # सांभाळ - पालन-पोषण

त्यांनी अनाथ मुलाचा सांभाळ केला. त्या मुलाने त्यांना म्हातारपणी सांभाळले.

श्रमिकांना - श्रमिक - श्रम करणारे workers, labourers #- श्रम - कष्ट, मेहनत

सुमारास - त्या वेळेस - सकाळच्या सुमारास - गाडीच्या सुमारास - परीक्षेच्या सुमारास

बहुदा - बऱ्याच वेळा - almost

कट्ट्यावर - कट्टा - ओटा - raised platform

भिक्षेकरी - भिकारी - भिक्षा करणारा/ मागणारा - beggar

चिरगुटे - फाटलेले कपडे - फाटून चिंध्यासारखे झालेले कपडे - shreds of cloth

कुडकुडत - कुडकुडणे - थंडीने थरथर कापणे - to Shiver due to Intense cold.

थरथरत्या - थरथरणे - to shiver

ओंकारेश्वराला - ओमकार + ईश्वर - पुण्यातील शिवमंदिराचे नाव

उसंत लाभली - उसंत लाभणे - रिकामा वेळ मिळणे -

उसंत - रिकामा वेळ, सवड, फुरसत - free time, leisure

अभ्यासामुळे उसंत लाभत नाही.

चक्कर मारावी - चक्कर मारणे - थोडेफार फिरून येणे - फेरफटका मारणे - to take around

जेवण झाल्यावर थोडी चक्कर मारतो.

लगबगीने - घाईघाईने hurriedly # लगबग - घाई, गडबड - hurry

उशीर झाल्यामुळे तो लगबगीने शाळेत गेला.

उलटतपासणी करणे - सखोल चौकशी करणे.

दीनवाणे जिणे - गरिबीचे जगणे - poor life # दीन - गरीब # दीनवाणे - गरीबीचे, दरिद्री, # जिणे - जगणे, जीवन -

पांघरून - पांघरणे - कशानेतरी झाकणे # पांघरूण - अच्छादन, झाकण्यासाठी वापरलेले कापड वगैरे covering

नकारार्थी - होकारार्थी - negative - positive

नकारार्थी मान हलवली - नकारार्थी मान हलवणे - मान हलवून नाही म्हणणे

खुलला - खुलणे - आनंदी होणे - delight

भल्या माणसा - भला माणूस - मोठा माणूस - चांगला माणूस - good person.

शाबूत - सुरक्षित - safe

लई मोठा - खूप मोठा

म्यास्नी - मला

म्या - मी

ईकल्या - विकल्या

जमले - जमणे - शक्य होणे - to be possible

अभाग्यांना - अभागी - दुर्दैवी - दुःखीकष्टी - unlucky

बिकट - कठीण - difficult, tough

सन्मानाच्या - सन्मान - सत् + मान -

शुभाशुभ होणे - बारे-वाईट / चांगले-वाईट होणे - शुभ + अशुभ = शुभाशुभ

====

पु ल देशपांडे - प्रसिद्ध लेखक

सुनीताबाई देशपांडे- प्रसिद्ध लेखिका, पु ल देशपांडे यांच्या पत्नी

वाई - सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण

कृष्णा नदी - महाराष्ट्रातून निघून कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, या राज्यातून जाणारी नदी

विश्वकोशाचे अध्यक्ष- "महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ" या संस्थेचे अध्यक्ष

प्राज्ञ पाठशाळा - वाई येथील शिक्षण संस्था, ग्रंथालय

नारायण सुर्वे - प्रसिद्ध कवी

शनिवार पेठ - पुण्यातील एक भाग # पेठ - मोहल्ला, विभाग, परिसर

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी