IX- संतकृपा झाली

प्रस्तावना-
समाजात जातिभेद, अंधश्रद्धा अशा वाईट गोष्टींनी थैमान घातले होते. यांच्या आधारे लोकांचे प्रचंड शोषण चालले होते. ते थांबवण्यासाठी व लोकांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठी संतांनी वारकरी पंथाची स्थापना केली. या वारकरी संप्रदायाचा इतिहास संत बहिणाबाई यांनी या अभंगात थोडक्यात आणि सोप्या शब्दात सांगितला आहे.
संतकवयित्री बहिणाबाई या संत तुकारामाच्या शिष्य आहेत.

लता मंगेशकर यांच्या आवाजातील हा अभंग पुढे देत आहे. तो ऐका. तुम्हाला नक्की आवडेल.


शब्दांचा अभ्यास-



वारकरी - पंढरपूरची वारी (यात्रा) करणारे - Pilgrims
संतकृपा - संतांची कृपा, कार्य # कृपा = graciousness,mercy
फळास येणे - पूर्ण होणे - To bear fruit -
पाया - तळ - Foundation, base
पाया रचणे - स्थापना करणे - To establish
रचिला - रचणे - तयार करणे - to construct
देवालय - देव + आलय - मंदिर - Temple
किंकर = पालन करणारा, सेवक - follower, attendant
आवार - अंगण, पटांगण - Courtyard
दिधला - दिला
सावकाश - शांतपणे - without hurry, Quietly
कळस - शिखर, उच्च स्थान - Pinnacle, top
ध्वज - झेंडा - flag
फडकणे - लहरणे - flatter
निरूपण - स्पष्टीकरण, विवेचना - explanation
बोजा - ओझे, कठीण गोष्ट - Burden

कवितेचा अर्थ-

संतकृपा झाली ।
इमारत फळा आली ।॥।१॥
अर्थ- संतांनी प्रचंड प्रयत्न करून वारकरी संप्रदाय निर्माण केला. संतांच्या कार्यामुळे ( कृपेमुळे) वारकरी पंथाची इमारत फळास आली.

ज्ञानदेवें रचिला पाया ।
उभारिलें देवालया ।।२॥॥
अर्थ- संत ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथाची स्थापना केली. या इमारतीचा पाया रचला. त्यावर या संप्रदायाचे भव्य देवालय निर्माण झाले.

नामा तयाचा किंकर ।
तेणें रचिलें तें आवार ।।३॥।
अर्थ- संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाच्या विचारांचे पालन केले. ( किंकर= पालन करणारा, सेवा करणारा, सेवक). त्यांनी भारतभर या संप्रदायाचा विस्तार केला. याचे आवार ( पटांगण) रचले.

जनार्दन एकनाथ ।
खांब दिधला भागवत ।॥।४॥
संअर्थ- त जनार्दन यांचे शिष्य संत एकनाथ यांनी या मंदिराला खांब दिले. या भागवत संप्रदायाला भक्कम आधार दिला. 

तुका झालासे कळस ।
भजन करा सावकाश ।!५॥
अर्थ- संत तुकारामांनी या संप्रदायाचा प्रचंड विकास आणि प्रसार केला. त्यामुळे ते या देवालयाचे कळस म्हणून शोभून दिसतात. अशाप्रकारे ही इमारत पूर्ण झाल्यामुळे आता कसलीही चिंता न करता शांतपणे भजन करावे.

बहिणी म्हणे फडकती ध्वजा ।
निरूपणा केलें बोजा ।॥६॥।
अर्थ- अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचा ध्वज उंचावर पडत आहे. संत बहिणाबाई म्हणतात, या प्रकारे वारकरी संप्रदायाची निर्मिती व विकास याचे कठीण विवरण सोप्या शब्दांमध्ये त्यांनी स्पष्ट केले.

'सकलसंतगाथा खंड दुसरा : संत बहिणाबाईंचे अभंग , अभंग क्रमांक ३२
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी.

प्र- 1, 2, 3, 4 

संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
मुद्दे Points -
भेद - विषमता - शोषण - अंधश्रद्धा - ढोंगीपणा - दांभिकता (Hypocrisy)
दया - क्षमा - शांती - परोपकार - प्रयत्नवादी (who believe in efforts )
साहित्य - अभंग - ओव्या - ग्रंथ - कीर्तने -
त्रास सोसला - कष्ट घेतले - समाज परिवर्तन

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी