प्रस्तावना- देवधर्माच्या नावावर लोकांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी, वाईट परंपरा संपवण्यासाठी, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, विषमता नष्ट करण्यासाठी वारकरी संप्रदायाने प्रचंड प्रयत्न केले. आपण स्वतः भक्ती करून देवापर्यंत पोचू शकतो, लोकांना जाणवून दिले. त्यासाठी विठ्ठल/ पांडुरंग ही देवता संतांनी लोकांपुढे ठेवली. लोकांनी विठ्ठलाचा स्वीकार करावा यासाठी विठ्ठलाचे गुणगान करणारे अभंग लिहिले. याच प्रकारे “ अंकिला मी दास तुझा” या अभंगातून विविध दृष्टांत वापरून विठ्ठलाच्या प्रेमाचे वर्णन केलेले आहे.
अग्निमाजि पडे बाळू |
माता धावे कनवाळू||1||
अर्थ- बाळ अग्नीमध्ये पडला, आग असेल तेथे गेला, त्याला चटका बसला, त्याला भाजले तर दयाळू आई त्याच्यासाठी धावून जाते. त्याच प्रमाणे संत नामदेव ज्यावेळी संकटात असतात त्या त्या वेळी विठ्ठल दयाळूपणे त्यांना वाचायला धावून जातो.
तैसा धावे माझिया काजा |
अंकिला मी दास तुझा ||2||
अर्थ- बाळ संकटात असताना त्याला वाचवण्यासाठी आई धावून जाते त्याच प्रमाणे संत नामदेव संकटात असताना विठ्ठल धावून जातो. विठ्ठलाच्या या कनवाळू स्वभावामुळे संत नामदेव हे विठ्ठलाचे अनुयायी बनलेले आहेत, विठ्ठलाला शरण गेलेले आहेत, ते स्वतःला विठ्ठलाचा दास म्हणवून घेत आहेत.
सवेची झेपावे पक्षिणी |
पिली पडताचि धरणी ||3||
अर्थ- पक्षिणीची पिल्ले घरट्यातून खाली पडली, जमिनीवर चालताना पडली, अशा प्रकारे त्यांना अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी पक्षीण लगेच जे पाहून येते. त्याप्रमाणे संत नामदेव संकटात असल्यास विठ्ठल लगेच वेगाने येतात.
भुकेले वत्सरावे |
धेनु हुंबरत धावे ||4||
अर्थ- भुकेलेले वासरू आईला बोलावण्यासाठी आवाज देते. ते ऐकताच त्याची आई- गाय हंबरून प्रतिसाद देते व त्याची भूक भागवण्यासाठी धावत वासराजवळ पोचते. त्याच प्रमाणे भक्ताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल धावून येतो.
वणवा लागलासे वनी |
पाडस चिंतीत हरणी ||5||
अर्थ- जंगलामध्ये वणवा ( मोठी आग) लागला तर जंगलात अडकलेल्या पाडसाला वाचवण्यासाठी हरिणी चिंतित होते. तिला स्वतःच्या जिवापेक्षा पाडसाच्या जीवाची चिंता जास्त असते. त्याप्रमाणे विठ्ठल ही भक्ताला संकटातून वाचवण्यासाठी धावून जातो.
नामा म्हणे मेघा जैसा |
विनवितो चातक तैसा||6||
अर्थ- चातक नावाचा पक्षी ढगातून पडणारे पाण्याचे थेंब पिऊन जगतो. त्याशिवाय तो जगू शकत नाही. तो चातक ढगाने यावे म्हणून ढगाची विनवणी करतो. त्याप्रमाणे विठ्ठलाची कृपा व्हावी यासाठी संत नामदेव विठ्ठलाची विनवणी करीत आहेत.
पुढील शब्दांचा अभ्यास करा-
अग्निमाजि - अग्नीमध्ये ( घरामाजि / खिशामाजि )
अग्नी - आग
माजि - मध्ये
कनवाळू - दयाळू
माझिया - माझ्या ( तुझिया / त्याचिया
काजा - कामासाठी ( काज- काम)
अंकिला - शरण आला
तैसा - तसा ( जैसा / कैसा )
सवेची - लगेच
झेपावे - झेप घेई ( झेपावणे- वेगाने येणे)
पक्षिणी - पक्षी याचे स्त्रीलिंगी रूप
धरणी - धरती, पृथ्वी
वत्सरावे - वासराच्या आवाजाने
धेनु - गाय
हुंबरत - हंबरत ( हंबरणे)
वणवा - जंगलातली मोठी आग
वनी - जंगलात ( घरी, दारी - ई प्रत्यय)
पाडस - हरिणीचे पिल्लू
स्वाध्याय- कृती-
1- Solve /Write
2- Solve /Write
3- Solve /Write
4- अ- खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा /Write
वणवा लागलासे वनी |
पाडस चिंतीत हरणी ||5||
उत्तर-
या ओळी “अंकिला मी दास तुझा” या अभंगातून घेतल्या आहेत. हा अभंग संत नामदेव यांनी लिहिला आहे. यामध्ये विविध दृष्टांत देऊन विठ्ठलाच्या कृपेची याचना केली आहे.
जंगलात वणवा लागल्यावर त्यात सापडलेल्या पाडसाला वाचवण्यासाठी हरिणी चिंतीत होते. पिल्लाला संकटातून वाचवण्याची तीव्र इच्छा तिला होते. चातक पक्षी ढगातून येणाऱ्या पावसाचे थेंब पिऊन जगतो. पाऊस हेच त्याचे जीवन असते. त्यामुळे तो जसा ढगांची वाट पाहतो, ढगांची विनवणी करतो अशी विनवणी विठ्ठलाची करीत आहे, असे संत नामदेव म्हणतात.
या उदाहरणांमधून संत नामदेवांनी उत्कट भावना व्यक्त केल्या आहेत. हरिणी आणि चातक यांची समर्पक उदाहरणे दिली आहेत. अभंगाची भाषा साधी, सरळ व सोपी आहे.
आ- Solve /Write
इ- सोदाहरण (स+ उदाहरण) उदाहरण देऊन स्पष्ट करावे. solve /Write
ई- स्वतःचा अनुभव आहे, असे उत्तर दिसले पाहिजे. Solve /Write
Thanks- Wikipedia |