X- Song-1- तू बुद्धी दे- 2

मुलांनो,

अक्षरभारती मधील पहिले गाणे “ तू बुद्धी दे” हे तुम्हाला आता छान तालासुरात गाता येत असेल. हे गीत “ डॉक्टर प्रकाश बाबा आमटे- द रियल हिरो” या चित्रपटामध्ये वापरलेले आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी (Leprosy Patients), शेतकरी, गावकरी, अनाथ मुले, सामाजिक संस्था इत्यादींसाठी प्रचंड कार्य केले आहे.
त्यांचे चिरंजीव डॉक्टर विकास व डॉक्टर प्रकाश हेही दीनदलित, गरीब, आदिवासी इत्यादींसाठी प्रचंड कार्य करत आहेत.
“ तू बुद्धी दे” या गीताचा एक वेगळा व्हिडिओ मला मिळाला. गीताच्या या पार्श्वभूमीवर (on background ) बाबा आमटे, प्रकाश आमटे आणि त्यांचे सहकारी यांचे वास्तविक कार्य दाखवले आहे. हा व्हिडीओ नक्की बघा. त्यातून तुम्हाला कवितेचा अर्थ अधिक जास्त स्पष्ट होईल, नवी माहिती मिळेल आणि एक अप्रतिम आनंद सुद्धा होईल.

ही कविता तालासुरात म्हणायची असा एक स्वाध्याय (assignment) आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत. पुस्तकात बघून म्हटली तरी चालेल. त्याविषयीच्या सूचना नंतर.

तोपर्यंत बाय-बाय!

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी