मुलांनो,
ही एक सुंदर गोष्ट आहे. पण या गोष्टीत शब्दच नाहीत. गोष्टीचं नाव आहे, “ माझा आगगाडीचा प्रवास.” या पुस्तिकेत फक्त चित्रे आहेत. आणि त्या चित्रांनी सुंदर गोष्ट तयार होते आहे. तर हे पुस्तक डाऊनलोड करून घ्या आणि बिना शब्दाची गोष्ट वाचून बघा!
चित्रे बघता बघता तुमच्या मनात सहज गोष्ट तयार होईल. चित्रांचे निरीक्षण (observation) जितक्या चांगल्या प्रकारे कराल तितकी चांगली गोष्ट तयार होईल. जितक्या जास्त वेळा काळजीपूर्वक चित्रे बघाल, तितकी गोष्ट जास्तीत जास्त विकसित (develop) व जाईल.
तुमच्या मित्राला ही गोष्ट सांगत आहात अशी कल्पना करा. डोळे मिटून ही गोष्ट त्या मित्राला मनातल्या मनात सांगा. ( हा लिहायचा स्वाध्याय नाही बरं! )