सप्तरंगी चेंडू- मजेदार गोष्ट

( इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी)

“सप्तरंगी चेंडू” ही मजेदार गोष्टीची छोटीशी पुस्तिका आहे. यात विशाल आणि विकास या छोट्या मुलांचे बाबा त्यांच्यासाठी सप्तरंगी चेंडू विकत आणतात. एकदा अंगणात खेळताना त्या मुलांना आकाशात इंद्रधनुष्य दिसते. त्यांच्या लक्षात येते की इंद्रधनुष्याचे रंगही आपल्या चेंडू प्रमाणेच आहेत.

आनंदाच्या भरात ते चेंडू जोरात वरती उडवतात. आणि चेंडू चक्क इंद्रधनुष्यात निघून जातो…. पुढे काय होते? ते वाचायला ही पुस्तिका डाऊनलोड करून घ्या.



ही पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

स्वाध्याय- ( लिहायचा नाही. पण याचा अभ्यास करायचा.)

1) या कथेत छोटे छोटे संवाद आलेले आहेत. ते कसे लिहिण्यात आलेत, त्यांच्यासाठी विरामचिन्हे कशी वापरली ते समजून घ्या.

2) या कथेत छोटी छोटी उद्गारार्थी वाक्य आलेली आहेत. ती उद्गारार्थी वाक्य कशी लिहितात ते समजून घ्या.

3) यात तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची नावे मिळतील. त्या रंगाच्या कोणत्या वस्तू आपल्याला दिसतात, त्याचा विचार करा.

4) इंद्रधनुष्याचे सात रंग समजून घ्या. VIBGYOR हे तुम्हाला माहीत आहे. मराठीत त्या रंगांचे संक्षिप्त रूप (Short Form) तानापिहिनिपाजा असे होते. कठीण वाटते? मग लक्षात ठेवा- जातानाही पाणी पी. सोपे आहे ना? हे रंग आहेत- जांभळा, तांबडा, नारिंगी, हिरवा, पारवा, निळा आणि पिवळा.

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी