माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू

“छोटा जवान” हा Black & White चित्रपट 1963 मध्ये प्रकाशित झाला होता. त्यातील “ माणुसकीच्या शत्रुसंगे
युद्ध आमुचे सुरू” हे ग. दि. माडगूळकर यांचे देशभक्तीपर गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. आजही ते तितकेच लोकप्रिय आहे. त्या चित्रपटातील त्या गीताचा हा व्हिडीओ ( 2 .50 Minutes) नक्की बघा.


माणुसकीच्या शत्रुसंगे
युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू



लढतिल सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर, भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर, पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी