बलसागर भारत होवो- एक सुंदर कविता

आज आपण एक छानशी देशाविषयीच्या प्रेमावरची कविता शिकणार आहोत व म्हणणार पण आहोत.


बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
अर्थ- बल म्हणजे शक्ती. भारत शक्तीचा सागर होवो. म्हणजेच खूप शक्तिवान होवो.



हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
अर्थ- हाती कंकण बांधणे म्हणजे एखादे व्रत स्वीकारणे. जनसेवेला जीवन दिल्याचे विरोध आम्ही स्वीकारले आहे. आमचे प्राण हे राष्ट्रासाठीच आहेत. राष्ट्रासाठी मी मरायलाही तयार आहे.

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
अर्थ- मी या देशाला श्रीमंत करीन, माझे सगळे काही देशाला देईन. देशासमोर असलेला अंधार नष्ट करीन. तुमचा बंधू समजून माझ्या या प्रयत्नाला मदत करायला तुम्हीही या.

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
अर्थ- आपण सर्वजण हातात हात घेऊन, हृदयाला हृदय जोडून, सर्वजण एक असल्याचा मंत्र जपूया. हे एकतेचे कार्य करायला तुम्हीही ही माझ्यासोबत या.

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
अर्थ- हातात महान असा ध्वज घेऊ, आम्हाला प्रिय असलेली भारताची गीते गाऊ. विश्वासाने आमच्या क्षेत्रात पराक्रम दाखवू. या देशाला पुन्हा महान स्थानी घेऊन जाऊ.

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
र्थ- सर्वजण या, आपण भरपूर प्रयत्न करू, भरपूर महान यश मिळवू. देशासाठी हे केले नाही तर आपलं जीवन काहीही ही उपयोगाचे नाही. या देशाच्या भाग्याचा सूर्य सतत प्रकाशीत राहो.

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
अर्थ- आपल्या प्रयत्नांनी हे मातृभूमि थोर म्हणजे महान होईल. दिव्य अशा वैभवाने शोधायला लागेल. हे भारत भूमी सर्व जगाला सुख शांती देईल. तो सोन्याचा दिवस लवकर येवो.

कवी : साने गुरुजी

स्वाध्याय-
ही कविता तालासुरात म्हणून पाठ करायची आहे.

छान विद्यार्थी ना तुम्ही! मग लागा तयारीला. 

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी