जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनचे कॉमिक्स

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनचे नाव माहित नाही असा सुशिक्षित माणूस शोधून सापडणार नाही.

आईन्स्टाईनचे आयुष्य अतिशय आकर्षक, नाट्यमय आणि अनपेक्षित असे होते. लहानपणी त्यांना गणित आवडत नव्हते; पण पुढे गणित शास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध झाले.
ज्या शाळेत त्यांना प्रवेश नाकारला, ती शाळा त्यांना नोकरी द्यायला पुढे पुढे करत होती. ज्या शाळेत ते नापास झाले ती शाळा त्यांना त्यांच्याकडे नोकरी करण्यासाठी विनंती करू लागली. या महान शास्त्रज्ञाला सुरुवातीला ऑफिस क्लार्कची नोकरी करावी लागली. ते धर्माने ज्यू होते आणि हिटलरने ज्यू लोकांविषयी प्रचंड द्वेष आणि हिंसाचार सुरू केला होता. त्यामुळे त्यांना स्वतःचा देश जर्मनी सोडून अमेरिकेत जावे लागले होते.

विज्ञानातील चमत्कार-पुरुष ठरलेल्या अशा या थोर शास्त्रज्ञाचे चरित्र गंमतशीर पद्धतीने २५ पृष्ठांच्या चित्रमय कॉमिक्स मध्ये दिले आहे. वाचा, तुम्हाला नक्कीच आवडेल.

ही पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

स्वाध्याय-
वाचा व विचार करा.

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी