मुलांनो,
आपण इयत्ता दहावीचे मराठी शिकण्याची सुरुवात करीत आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकात पहिली कविता “ तू बुद्धि दे…” एक अतिशय सुंदर, अतिशय छान असे गीत आहे. सुप्रसिद्ध समाजसेवक “बाबा आमटे” यांचे चिरंजीव प्रकाश आमटे यांच्यावरील एका चित्रपटात हे गीत घेतले आहे.
हे गीत आम्ही तुम्हाला दूरशिक्षण पद्धतीने (Distance Education Method) शिकवणार आहोतच. पण त्याआधी तुम्ही काही तयारी करायची आहे. त्यासाठी ही कविता नीट वाचून घ्या, जितकी होईल तितकी समजून घ्या. त्यानंतर खाली या कवितेच्या गायनाचा व्हिडिओ दिला आहे. त्यावर क्लिक करा. गाणे ऐका. ऐकता ऐकता गाणे म्हणा. अशा पद्धतीने गाणे पाठ करा.<
कविता, पाठ शिकवण्याच्या सूचना, त्यावरील गृहपाठ याविषयीच्या सूचना येथे नियमितपणे देण्यात येतील.
काही विचारायचे असल्यास खलील कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे. शक्य होईल त्याप्रमाणे उत्तरे देऊ
तोपर्यंत बाय-बाय….