How to reduce/compress file size?

फोटो, ऑडिओ व व्हिडिओ यांच्या फाइल्स कम्प्रेस करणे हे खूप सोपे आहे. कम्प्रेस केलेल्या फाइल्स इंटरनेटवरून पाठवल्यास आपला व दुसऱ्यांचा खूप डेटा वाचतो, खूप वेळही वाचतो. म्हणून स्वाध्याय (Assignments) पाठवताना मोठ्या फाईल कॉम्प्रेस करून पाठवण्याची सवय ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपला व दुसर्‍यांचा डेटा, पैसे, वेळ वाचतो. 

कॉम्प्रेशन कसे करावे याची पद्धती खाली व्हिडिओ मध्ये व त्यानंतर लिहून दिली आहे. लक्षपूर्वक बघितल्यास/ वाचल्यास खूप सोपी वाटेल.


फोटो कॉम्प्रेशन-

मोबाईलचा कॅमेरा ऑन केल्यावर, Photo सिलेक्ट केल्यावर > वरच्या बाजूला बारीक आडव्या तीन रेषा दिसतील. त्यावर क्लिक करून > मग तेथील कॅमेरा सेटिंग मध्ये जाऊन Picture Quality कॉलिटी Low सिलेक्ट केल्यास फोटोचा आकार काही mb कमी होतो.
Logo of pCrop
फोटो कम्प्रेशन याविषयी अनेक ॲप आहेत. मी "pCrop: Photo Resizer and Compress" हे ॲप वापरतो. यात इमेज 25% ते 30% पर्यंत किंवा त्याखाली आणून ठेवली तरी चांगला परिणाम मिळतो. 6mb चा फोटो 150kb पर्यंत सुद्धा आणता येतो.

व्हिडिओ कॉम्प्रेशन-

मोबाईलचा कॅमेरा ऑन केल्यावर, Video सिलेक्ट केल्यावर > वरच्या बाजूला बारीक आडव्या तीन रेषा दिसतील. त्यावर क्लिक करून > मग तेथील सेटिंग मध्ये जाऊन व्हिडिओ कॉलिटी SD 480p सिलेक्ट केल्यास व्हिडिओ चा आकार बराच mb कमी होतो.
Logo of Video Compress
व्हिडिओ कॉम्प्रेशन यासाठीसुद्धा अनेक आहेत. मी Mel studio apps चे Video Compress हे ॲप वापरतो. यात 50mb चा व्हिडिओ 10mb पर्यंत सुद्धा कॉम्प्रेस करता येतो. यासाठी ॲप सुरू करून > व्हिडिओ सिलेक्ट करून > हवा तो साइज सिलेक्ट करून > कम्प्रेस हे बटन दाबावे.

हे दोन्ही ॲप ऍड सपोर्टेड आहेत, त्यामुळे नेट बंद ठेवून त्यांचा उपयोग केल्यास जाहिरातींचा अडथळा कमी होतो.

ऑडिओ कॉम्प्रेशन-

यासाठी मला सोपे व समाधानकारक ॲप मिळाले नाही. पण https://www.onlineconverter.com/compress-mp3 ही साईट मिळाली. त्यात ऑडिओ फाईल सिलेक्ट करून > क्वालिटी सिलेक्ट करून > कॉम्प्रेस बटन दाबले की काम झाले.
Logo of Audio Conversion Site. 
PDF मेकिंग व PDF कॉम्प्रेशन

जेव्हा तुम्हाला काही पानांचा स्वाध्याय दिला जातो तेव्हा त्या पानांचे फोटो काढून त्यांची एकच पीडीएफ फाईल बनवणे सोयीचे ठरते. त्यासाठी CamScanner हे ॲप मला चांगले वाटले. यात 4-5 पानांची तसेच 20-25 पानांची पीडीएफ फाईल सहज बनवता येते. अगदी 100-200 पानांचेही पीडीएफ तयार करता येते.

त्यासाठी CamScanner ने पाहिजे तेवढे फोटो काढून, त्यातील PDF बटन वर क्लिक केले की PDF फाईल तयार होते.
Logo of CamScanner
अशा पीडीएफ फाइलचा आकार बराच मोठा, जास्त mb चा असतो. तो आकार छोटा करायला मला Compress PDF File हे ॲप चांगले वाटले. त्यात पीडीएफ अपलोड करायची > सिलेक्ट एक्सट्रीम कॉम्प्रेशन > कॉम्प्रेस > याप्रकारे सुमारे पाच ते दहा पट लहान आकाराचे पीडीएफ तयार होते.
Logo of Compress PDF app
अनेक शुभेच्छांसह ---
= = =
Disclaimer- I/we don,t have any relation with abovesaid apps and sites. Information given in good faith FYI. You may use it with expert's consultation. 

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी